'अनोळखी'
फार दिवस झाले नसतील
माझा भाव वाढला होता
"ती तुझ्यावर फीदा आहे"
मित्रांनी निष्कर्श काढला होता
मला एकदम मजा वाटली
प्रेमाची शंका मनात दाटली
हेच सगळ प्रेम असेल का?
तिचाही माझ्यावर जीव बसेल का?
दर दिवशी बागेमध्ये
मैत्रीणींबरोबर ती तिथेच बसायची
ओझरतं का होइना पण
न चुकता माझ्याशी हसायची
तिच्याशी एकदाच हसण्यासाठी
संध्याकाळ ची वाट पहायचो
परीक्षा असो नाहीतर क्रिकेट मॅच
पण बागेत मात्र जाउनच रहायचो
दिसायला आणी वागायला
वाटायची ती फारच गोड
लपून छपून बघण्याची
तिला ही होती माझ्या इतकीच खोड
हसण्याचे बोलणे झाले
उशीरा का होइना, पण सुरु झाले
पण बोलणार तरी काय
हा प्रश्न मोठा पडायचा
काहीच कॉमन नव्हते आणी
अनोळखीपणा अडायचा
बोलायचं काय म्हणून ?
ओळख तेवढी नव्हती
आणी काय नात्याने बोलायच
ही अडचण समोर होती
दिवसांमागून दिवस गेले
मित्र आग्रह करू लागले
"अरे!! विचारून टाक तिला,
आणी पार्टी हवी मग आम्हाला "
किती दिवस थांबणार
म्हणून धीर एकदा केला
मनामधला विचार शेवटी
जीभेपर्यंत आणला
पण नेमकं नको तेच झालं
"नाही" असं उत्तर आलं
मन मात्र दाटून आलं
मला नाही म्हणताना
तिचाही आवाज कापत होता
नाही बोलताना तिचा प्रॉब्लेम
मला मात्र कळत होता
लोकांना काय सांगणार
भेट कुठे झाली
याच भितीने ती कधी
पुढे नाही आली
गेले काही दिवस जरी
तिच्यासाठीच जगत होतो
तिच्या डोळ्यात मात्र स्वतः ला
एक 'अनोळखी' म्हणून बघत होतो
नशीबानेच ठरवलेला या गोष्टीचा शेवट
काय करणार, पुढे निघालो हृदयावर दगड ठेवत !!!